शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Budget2023: सहकार क्षेत्राला दिलासा, साखर उद्योगाचे दहा हजार कोटींचे ओझे झाले कमी 

By विश्वास पाटील | Updated: February 2, 2023 16:54 IST

महाराष्ट्रासह कर्नाटक आदी राज्यातील कारखान्यांची प्राप्तिकराच्या १० हजार कोटी रुपयांच्या देण्यातून कायमची सुटका

विश्वास पाटीलकोल्हापूर : केंद्र शासनाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी अन्य कोणतीही भरीव घोषणा नसली तरी सहकारी साखर कारखानदारीच्या डोक्यावरील प्राप्तिकराची टांगती तलवार मात्र कायमची दूर झाली. साखर कारखानदारीला त्याचा मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक आदी राज्यातील कारखान्यांची प्राप्तिकराच्या १० हजार कोटी रुपयांच्या देण्यातून कायमची सुटका झाली. गेली २४ वर्षे प्राप्तिकराच्या नोटिसीचे हे भूत मागे लागले होते. सरकारने त्यासंबंधीची तरतूदच रद्द केल्याने आता ज्या कारखान्यांनी प्राप्तिकरापोटी काही रक्कम भरली होती, ती त्यांना परत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी जास्त असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. पूर्वी एसएमपी व नंतर एफआरपीपेक्षा जास्त रक्कम बिलापोटी कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली होती. कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेली बिले हा खर्च न मानता तो नफा गृहित धरून त्यावर प्राप्तिकर भरा अशा नोटिसा काढण्यात आल्या. १९९८-९९ पासून ते २०१६ पर्यंत हा प्रश्न लोंबकळत होता. केंद्र सरकारने २०१६ ला त्यासंबंधीची तरतूद रद्द केली. परंतु त्यापूर्वीच्या रकमेचे काय हा प्रश्न लोंबकळत तसाच होता. ही रक्कम रद्द व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या पातळीवर बरेच प्रयत्न झाले. परंतु यश आले नव्हते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात ती तरतूद रद्द करण्याचा निर्णय झाल्याने कारखान्यांना आता ही रक्कम भरावी लागणार नाही.प्रत्येक वर्षी मार्चमध्ये प्राप्तिकर विभागातर्फे कारखान्यांना ही रक्कम भरण्यासाठी दबाव टाकला जायचा. त्यामुळे चांगली आर्थिक स्थिती असलेल्या कारखान्यांनी प्रतिवर्षी काही रक्कम भरली आहे. ती त्यांना आता परत मिळू शकते. काही कारखान्यांची स्थिती अशी होती की, त्यांनी सारी मालमत्ता विकली तरी ही रक्कम त्यांना भरता आली नसती..

सहकारी साखर कारखानदारीच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खूप वर्षाचे जुने दुखणे कायमचे बरे झाले. साखर कारखान्यांच्या जुन्या कर्जाची पुनर्रचना झाली असती तर त्याचा या उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असता. - विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2023Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Sugar factoryसाखर कारखाने