शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रुसेल्स :  पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या आवश्यक - संभाजीराजे, ब्रुसेल्समधील परिषदेत मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:43 IST

बदलत्या हवामानामुळे स्थलांतर होते यावर आता जगभरात एकमत होत आहे. मात्र पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या आवश्यकब्रुसेल्स येथे आयोजित दहाव्या आशिया युरोप संसदीय सहयोग बैठकीमध्ये भारताच्यावतीने संभाजीराजे यांनी हे मत व्यक्त केले नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या स्थलांतराकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे,

ब्रुसेल्स : बदलत्या हवामानामुळे स्थलांतर होते यावर आता जगभरात एकमत होत आहे. मात्र पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

ब्रुसेल्स येथे आयोजित दहाव्या आशिया युरोप संसदीय सहयोग बैठकीमध्ये भारताच्यावतीने संभाजीराजे यांनी हे मत व्यक्त केले. दोन दिवसांच्या या परिषदेसाठी भारतातर्फे तीन खासदारांना पाठवण्यात आले असून यामध्ये संभाजीराजे यांचा समावेश आहे.यावेळी संभाजीराजे म्हणाले, १९९० मध्ये हवामान बदलावरील आंतरसरकारीय मंडळाने (आयपीसीसी) तयार केलेलेल्या समीक्षणात्मक अहवालात प्रथम हवामान बदलामुळे होणा-या विस्थापनाचा मुद्दा मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या विविध पैलूंवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिकडेच चर्चा झाली. या चर्चेदरम्यान हवामान बदलामुळे होणारे स्थलांतर या मुद्यावर अधिक गांभिर्याने चर्चा झाली आहे.

ते म्हणाले की स्थलांतर ही जागतिक अर्थव्यवस्थेतील एक स्वयंप्रेरित अशी एक प्रक्रिया आहे, आणि ती या अर्थव्यवस्थेचा एक अभिन्न भाग आहे. अनेक व्यावसायिक, कामगार, व्यापारी, विद्यार्थी विविध कारणांसाठी स्थलांतर करत असतात. अचानक येणा-या नैसर्गिक आपत्ती या हवामान बदलाच्या हळूहळू होणा-या परिणामांपासून वेगळ्या केल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे यावर संभाजीराजे यांनी भर दिला. नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या स्थलांतराकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट आॅन मायग्रेशन’ या विषयावरील मसुदाही अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर