सुपरव्होट पानासाठी संक्षित बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:48+5:302021-01-08T05:19:48+5:30

शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सतरा जागेवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. ...

Brief news for the SuperVote page | सुपरव्होट पानासाठी संक्षित बातम्या

सुपरव्होट पानासाठी संक्षित बातम्या

शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सतरा जागेवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुरुष उमेदवारापेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. सध्या निवडणुकीतदेखील महिला उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांचे कुटुंबीयदेखील प्रचारात उतरले आहेत.

-

निवडणुकीचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार

जयसिंगपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला जात आहे. उमेदवारांकडून व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रचार रंगतदार बनला आहे. मतदान यंत्रावरील उमेदवाराचा क्रमांक व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवला जात आहे.

- अटीतटींच्या लढतींकडे लक्ष

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील दानोळी, उदगांव, नांदणी, यड्राव, दत्तवाड, चिपरी येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. मोठ्या गावातील निवडणुका तालुका नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे विकासकामांची भरीव आश्वासने पॅनेल प्रमुखांकडून दिली जात आहेत. अपक्षांनीही अनेक प्रभागात जोर लावला आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

Web Title: Brief news for the SuperVote page