संक्षिप्त बातम्या इचलकरंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:38+5:302021-03-26T04:23:38+5:30
इचलकरंजी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शहीद दिन साजरा करण्यात आला. भगतसिंग उद्यानातील शहीद भगतसिंग यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण ...

संक्षिप्त बातम्या इचलकरंजी
इचलकरंजी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शहीद दिन साजरा करण्यात आला. भगतसिंग उद्यानातील शहीद भगतसिंग यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रूपराज घवाळे, विशाल बाबर, संकल्प पाटील, सर्वेश सावळकर, आदेश दायमा, मेघा तोडकर उपस्थित होते.
‘कृषी कायदे-२०२०’ विषयावर चर्चासत्र
इचलकरंजी : जयवंत महाविद्यालयात ‘कृषी कायदे-२०२०’ या विषयावर चर्चासत्र झाले. शांताराम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी केले. चर्चासत्रात एवन आवळे, प्रा. योगेश माळी यांच्यासह प्राध्यापकांनी भूमिका मांडली. डॉ. शकुंतला पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.
आजादी का अमृतमहोत्सव साजरा
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. ए. एस. कटकोळे यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. डी. सी. कांबळे, मेजर वीरकर यांच्यासह एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. विशाल गोडबोले यांनी आभार मानले.