संक्षिप्त बातम्या शिरोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST2021-07-16T04:17:12+5:302021-07-16T04:17:12+5:30

बुबनाळ : बुबनाळ (ता. शिरोळ) येथे गॅसच्या भडक्यात आलिमा बाशुद्दीन झांबरे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. त्यांना सांगली ...

Brief news headlines | संक्षिप्त बातम्या शिरोळ

संक्षिप्त बातम्या शिरोळ

बुबनाळ : बुबनाळ (ता. शिरोळ) येथे गॅसच्या भडक्यात आलिमा बाशुद्दीन झांबरे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावचावडी कार्यालयाशेजारी आलिमा झांबरे या एका खोलीत राहतात. खोलीतच स्वयंपाक घर आहे. पहाटे उठून अंघोळीसाठी पाणी तापवले. नंतर चहा करण्यासाठी गेल्या असता गॅसचा भडका उडाला. त्यामध्ये आलिमा यांचे तोंड, हात भाजून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. गॅसच्या भडक्याची तीव्रता शेजारील कुटुंबासह पलीकडे असलेल्या मुलगा, सुनेलाही जाणवली. नंतर मुलगा, सून खोलीत गेले असता आलिमा जखमी आढळून आल्या.

----------------------

औरवाडमध्ये औषधांचे वाटप

बुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथे प्रतापराव आगरे आणि ग्रामपंचायत सदस्य जयवंत मंगसुळे यांच्यावतीने औरवाड (ता. शिरोळ) येथील लसीकरण केंद्रात लस घेण्याऱ्या नागरिकांना औषधी गोळ्या देण्यात आल्या. यावेळी आशिष आगरे, कुमार आगरे यांच्यासह आरोग्यसेविका उपस्थित होत्या.

Web Title: Brief news headlines