संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:02+5:302021-01-18T04:22:02+5:30
कोल्हापूर : करवीरनगर वाचन मंदिरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून तीन दिवस ...

संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक
कोल्हापूर : करवीरनगर वाचन मंदिरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून तीन दिवस सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही व्याख्यानमाला होणार आहे.
याअंतर्गत मंगळवारी (दि.१९) ‘साहित्यिकांची लेखणी’ या विषयावर राम देशपांडे यांची मुलाखत, बुधवारी (दि.२०) युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला यांची मुलाखत डॉ. अमर आडके घेणार आहेत. गुरुवारी (दि. २१) ‘संत वाङ्मयातील पक्षी’ या विषयावर चित्कला कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
मोफत रोग निदान शिबिर
कोल्हापूर : येथील वनौषधी विद्यापीठातर्फे १८ ते ३० जानेवारीदरम्यान मोफत आयुर्वेद रोगनिदान व चिकित्सा सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मीपुरी येथील सेंटरमध्ये सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होणाऱ्या या शिबिरात अपचन, स्त्रियांचे, बालकांचे विकार, मानसिक तक्रारी, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
--
वीरशैव समाजाचा वधू-वर मेळावा
कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर पालक मेळावा १३ फेब्रूवारीला अक्कमहादेवी मंडपात होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत होणाऱ्या मेळाव्यात समाजातील सर्व जाती-उपजातीतील युवक व युवतींना सहभागी होता येईल. तरी इच्छूकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत स्वामी, राजू वाली, राजेश पाटील यांनी केले आहे.
--