संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST2021-01-13T04:57:42+5:302021-01-13T04:57:42+5:30

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील चाणक्य मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत सकाळी ...

Brief news-cultural | संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

संक्षिप्त वृत्त-सांस्कृतिक

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील चाणक्य मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत सकाळी नऊ वाजता माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबीर होणार आहे.

--

रयत मिलिटरी अकॅडमीचे उद्‌घाटन

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयातील रयत मिलिटरी अकॅडमीचे उद्‌घाटन कर्नल किशोरकुमार मोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संजय साठे होते.

यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा. नंदिनी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सायरा मुलाणी यांनी आभार मानले. प्रा. डॉ. करीम मुल्ला यांनी सूत्रसंचालन केेले.

--

Web Title: Brief news-cultural