संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:26+5:302021-06-05T04:19:26+5:30

जयसिंगपूर : शहरासह परिसरात शुक्रवारी ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील सहावी गल्ली, चौदावी गल्ली, सोळावी गल्ली, शिवशक्ती कॉलनी, ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : शहरासह परिसरात शुक्रवारी ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील सहावी गल्ली, चौदावी गल्ली, सोळावी गल्ली, शिवशक्ती कॉलनी, समडोळे मळा, शाहूनगर, अवचितनगर, रेल्वे स्टेशनजवळ, जयसिंगनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी याठिकाणी २२ रुग्ण मिळून आले. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या १५० वर पोहोचली आहे. तर उदगाव ५, संभाजीपूर ३, चिपरी ३ असे नव्या रुग्णांची भर पडली.

-------------------------------

ग्रामविकास अधिकाऱ्याची सामाजिक बांधिलकी

यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील ग्रामविकास अधिकारी हेमंत जाधव यांनी सामाजिक बांधिलकीतून जांभळी व कवठेसार आरोग्य केंद्रास औषधे, सीरिंज देण्यात आली. कोविड लसीकरणाकरिता आरोग्य उपकेंद्रांना प्रत्येकी १ हजार पॅरासिटामोल गोळ्या व दोनशे इंजेक्शन सीरिंज देण्यात आल्या. जांभळी येथे सरपंच खंडू खिलारे व आरोग्य सेविका मेवेकरी यांच्याकडे तर, कवठेसार उपकेंद्रामध्ये सरपंच दीपाली भोकरे व आरोग्य सेविका उज्ज्वला महाजन यांच्याकडे औषधे देण्यात आली.

Web Title: Brief news