संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST2021-06-05T04:17:43+5:302021-06-05T04:17:43+5:30

जयसिंगपूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे पादचा-यांना ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे पादचा-यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. एखादे वाहन आल्यास खड्ड्यांतील पाणी पादचा-यांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडत होते. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

--------------------

गतिरोधक बसविण्याची मागणी

शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संतूबाई दूध डेअरीसमोर असणा-या मार्गावर गतिरोधक बसविण्याची गरज आहे. मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरुन वाहने भरधावपणे ये-जा करीत असतात. मात्र, रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहणार आहे.

----------------------

हेरवाडमधील पथदिवे दुरुस्त करा

जयसिंगपूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळा परिसरात बसविण्यात आलेल्या हायमास्ट पथदिव्यातील एक बल्ब खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते. मात्र, यामधील एक बल्ब खराब झाला आहे. त्यामुळे या बल्बची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: Brief news