संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:01+5:302021-06-01T04:19:01+5:30

इचलकरंजी : येथील राहुल गडकरी यांनी आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. मिळवली. 'डेव्हलपमेंट ऑफ सस्टेनेबल वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम' या विषयावर ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : येथील राहुल गडकरी यांनी आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. मिळवली. 'डेव्हलपमेंट ऑफ सस्टेनेबल वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम' या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांना अपूरबा दास व वाझेद अली यांचे मार्गदर्शन लाभले.

गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

इचलकरंजी : लोणारी समाजाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची जाणीव ठेवून समजाने हे साहित्य दिले. या उपक्रमासाठी नगरसेवक विठ्ठल चोपडे, सचिन राणे, मंगेश कांबुरे, आदींचे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कबनूर : येथील छत्रपती युवा फाउंडेशनमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन प्रमोद पाटील यांनी केले. ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी विनायक गुंडकल्ले, मनोहर मणेरे, सुधीर लिगाडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Brief news