संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:12+5:302021-06-01T04:17:12+5:30

शिरोळ : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ येथे गरजूंना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. कोविडच्या ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

शिरोळ : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ येथे गरजूंना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या वेळी प्रा. सचिन पाटील, किरण पाटील, सतीश कोळी, प्रणव पाटील, प्रमोद काळे, शरद मोरे, प्रमोद कारदगे उपस्थित होते.

------------------

हेरवाडमध्ये रुग्णांना फळे वाटप

जयसिंगपूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून होळकर ग्रुपच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी अर्जुन जाधव, संतोष पुजारी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------

शिरोळमध्ये होळकर जयंती

शिरोळ : येथील नगरपालिकेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक योगेश पुजारी, तातोबा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी होळकर जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.