संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST2021-05-29T04:18:30+5:302021-05-29T04:18:30+5:30

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत नगरपालिकेतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० व ३१ मेला अलगीकरण ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत नगरपालिकेतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० व ३१ मेला अलगीकरण केंद्राचे उद्घाटन, विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम व निर्जंतुकीकरण हे कार्यक्रम होणार आहेत.

घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी

इचलकरंजी : कोरोनामुळे व्यवसायातील सातत्याने येणाऱ्या मंदीमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य उद्योजक, कर्जदार हतबल होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तरी आर्थिक वषार्तील घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी, अशा मागणीचे निवेदन परिसरातील कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले. शिष्टमंडळात सुधीर उत्तुरे, मिलिंद कांबळे, सतीश लाटणे, योगेश वाघमारे, संजय जकाते, नंदकुमार लोखंडे, निवृत्ती आमणे यांचा समावेश होता.

Web Title: Brief news