संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST2021-05-27T04:27:05+5:302021-05-27T04:27:05+5:30

जयसिंगपूर : निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेमध्ये बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुध्द ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेमध्ये बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रवीण धनवडे यांनी केले. यावेळी जी.डी. धनवडे, प्रशांत धनवडे, मनोहर धनवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निमशिरगांव येथे अतिक्रमणावर कारवाई

जयसिंगपूर : निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांतून स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर घरे, पत्र्याचे शेड, जनावरांचा गोठा बांधून अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. नोटिसा देऊनही अतिक्रमणे काढली नसल्याने कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला.

फोटो - २६०५२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढून टाकण्यात आली.

Web Title: Brief news