संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST2021-09-16T04:29:22+5:302021-09-16T04:29:22+5:30

जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी एच.एस.सी. परीक्षा आज गुरुवारपासून सुरू होत आहे. ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी एच.एस.सी. परीक्षा आज गुरुवारपासून सुरू होत आहे. जयसिंगपूर महाविद्यालय येथे केंद्र क्रमांक ५४५ मध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रसंचालक एम. एस. पाटील यांनी दिली.

-------------------

संजय तलबार पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर : नांदेडच्या विष्णुपुरी येथील एस. जी. जी. एस. कॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेतील प्रा. डॉ. संजय निळकंठ तलबार यांना दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यावतीने विश्वेवराच्या बेस्ट टिचर अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. तलबार यांनी ३४ वर्षे एस. जी. जी. एस. कॉलेजमध्ये सेवा बजावली आहे. दिल्ली येथे शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान, मंत्री राजकुमार रंजनसिंह, प्रा. ए. डी. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

फोटो - १५०९२०२१-जेएवाय-०१-डॉ. संजय तलबार

Web Title: Brief news