संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST2021-09-02T04:51:49+5:302021-09-02T04:51:49+5:30

अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील धनगर समाजातील युवकांनी शिक्षण घेऊन पुढे यावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील धनगर समाजातील युवकांनी शिक्षण घेऊन पुढे यावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन पुणे महापालिकेचे सेवानिवृत्त सहआयुक्त संभाजी खोत यांनी केले. बिरोबा माळ येथे असलेल्या घोडगिरी देवस्थानच्या हेडगी यात्रेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते. यावेळी शंकर देवर्षी, बजरंग देवर्षी, पमा डोंगरे, गजानन करे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

-----------------

अवजड वाहतूक सुरूच

शिरोळ : शहरातील मुख्य मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच बाजारपेठेत असणाऱ्या नागरिकांना या वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अवजड वाहतूक ग्रामीण रुग्णालय ते पद्माराजे विद्यालय अशी वळविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

------------------

स्वच्छतागृहाची स्वच्छता करा

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळील स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Brief news