संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:30+5:302021-09-02T04:50:30+5:30

दत्तवाड : शिरोळ विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी स्वप्निल पाटील तर, तालुका सरचिटणीसपदी विनोद पाटील यांची निवड केली. सैनिक टाकळी ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

दत्तवाड : शिरोळ विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी स्वप्निल पाटील तर, तालुका सरचिटणीसपदी विनोद पाटील यांची निवड केली. सैनिक टाकळी येथील अध्यक्षपदी सुशील पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पालकमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले. या निवडीमुळे टाकळी परिसरात काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. या निवडीसाठी शिरोळचे नगरसेवक तातोबा पाटील, सुहास पाटील व वैभव पाटील यांचे सहकार्य लाभले.

-------------------------

बेशिस्त पार्किंगवर कारवाईची गरज

जयसिंगपूर : शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा कोंडी होत आहे. परिणामी याचा नाहक त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर पोलिसांनी व पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

-----------------

गणेशोत्सवाची खरेदी

शिरोळ : शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध स्टॉल लागले आहेत. नागरिकांकडून विविध साहित्य, डेकोरेशन, लाईटिंग यांसह साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. विविध रंगाच्या व विविध रूपातील गणेशमूर्तींकडे ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत.

Web Title: Brief news