संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:46+5:302021-06-11T04:16:46+5:30

जयसिंगपूर : शहरात गुरुवारी सकाळी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही दिसत होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने विनामास्क ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : शहरात गुरुवारी सकाळी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही दिसत होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने विनामास्क फिरणारे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.

हेरवाडमध्ये रस्त्याची दुरवस्था

शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथील माळभागावरील ग्रामदैवत श्री संतुआई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यातील खड्डयांमुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गावरून भरधावपणे वाहतूक होत असते. रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Brief news