संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:24+5:302021-07-01T04:17:24+5:30

जयसिंगपूर : वेलफेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचे संस्थापक पद्मश्री नाना चुडासमा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जायंट्स आॅफ दुर्गा सहेलीच्यावतीने वृक्षारोपण ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : वेलफेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचे संस्थापक पद्मश्री नाना चुडासमा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जायंट्स आॅफ दुर्गा सहेलीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. मौजे आगर येथील महावीर सोसायटीमध्ये चार्टर्ड अकौंटंट विद्यासागर बस्तवाडे यांच्या सहकार्याने सुधीर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्नेहल कुलकर्णी, नलिनी देसाई, अनुराधा वेल्हाळ, संगीता जाधव, कुसुम जगदाळे, ललिता ऐनापुरे उपस्थित होत्या.

-------------------------

ग्रामीण भागात घडी विस्कळीत

जयसिंगपूर : सध्या कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झाला नाही. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच व्यवहार पूर्णत: विस्कळीत झाले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच विस्कळीत झालेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर येवू शकणार आहे.

----------------------

काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

शिरोळ : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक घातक असल्याचे आकडेवारीनुसार निदर्शनास आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.