संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:01+5:302021-06-24T04:17:01+5:30

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील मरगुबाई मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. त्यामुळे गेल्या कित्येक ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील मरगुबाई मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याला मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

-----------------------

जयसिंगपुरात गर्दी

जयसिंगपूर : शहरातील अकराव्या गल्लीतील डेबॉन्स कॉर्नर परिसरात भाजी विक्रेत्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे याठिकाणी भाजी खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. दहाव्या गल्लीत पालिकेने भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी मज्जाव केला होता. त्यामुळे नांदणी रोडवर सध्या भाजी विक्रीसाठी विक्रेते बसत असल्यामुळे गर्दी होत आहे.

-------------------

पथदिवे बसवा

शिरोळ : येथील नृसिंहवाडीकडे जाणा-या मार्गावर पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे. नृसिंहवाडी येथे दत्त देवस्थान असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत येत असतात. मध्यंतरी भाविकांच्या सोयीसाठी या मार्गावर पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र ते खराब झाले असल्याने या मार्गावर पथदिवे बसवावेत, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

Web Title: Brief news