संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:20+5:302021-06-23T04:16:20+5:30

इचलकरंजी : येथील कुंभार समाजाच्या अध्यक्षपदी उत्तम कुंभार यांची निवड एकमताने झाली. तसेच उपाध्यक्षपदी बाळू कुंभार, सचिवपदी निखिल कुंभार ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : येथील कुंभार समाजाच्या अध्यक्षपदी उत्तम कुंभार यांची निवड एकमताने झाली. तसेच उपाध्यक्षपदी बाळू कुंभार, सचिवपदी निखिल कुंभार व खजिनदारपदी अतिष कुंभार यांची निवड झाली. समाजाच्या पदाधिकारी बैठकीत या निवडी करण्यात आल्या. कार्यकारिणीमध्ये गोरख कुंभार, सुभाष कुंभार, बजरंग कुंभार, शंकर कुंभार, दीपक कुंभार यांचा समावेश आहे.

तन्मयी संगेवार हिची निवड

इचलकरंजी : येथील डीकेटीई इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी तन्मयी सुनीलदत्त संगेवार हिची पुणे येथे होणा-या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली आहे. तन्मयी हिने १९० पैकी १६४ गुण मिळवले असून, खुल्या प्रवर्गामध्ये १४७ वा नंबर आला आहे. या यशाबद्दल तिचा आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे यांनी सत्कार केला.

रस्ता कामाचा प्रारंभ

कबनूर : आझादनगर येथील खराब झालेल्या गटारीचे व एकता चौक येथील रस्ता कामाचा प्रारंभ सरपंच शोभा पोवार यांनी केला. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, जि. प. सदस्या विजया पाटील, अशोक पाटील, बी. डी. पाटील, प्रमोद पाटील, सुलोचना कट्टी, रजनी गुरव आदी उपस्थित होते. जावेद मुजावर यांनी आभार मानले.

Web Title: Brief news