संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:51+5:302021-06-09T04:29:51+5:30
इचलकरंजी : पोस्टमास्तर धनपाल माणकापुरे यांनी सेवानिवृत्ती समारंभातील अतिरिक्त खर्च टाळून कोरोना रुग्णांसाठी मदत केली. सेवाभारती दवाखाना व चाणक्य ...

संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : पोस्टमास्तर धनपाल माणकापुरे यांनी सेवानिवृत्ती समारंभातील अतिरिक्त खर्च टाळून कोरोना रुग्णांसाठी मदत केली. सेवाभारती दवाखाना व चाणक्य अंत्यसंस्कार केंद्राला १५ हजार व १० हजार रुपयांचा धनादेश भगतराम छाबडा यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी प्रकाश गणपुले, अरविंद कुलकर्णी, संजीव सामानगडकर आदी उपस्थित होते.
ऑनलाईन व्याख्यान
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये ' छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना ' या विषयावर निलेश वळकुंजे यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, पर्यावरणीय धोरणांचे विश्लेषण केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे होते. अरुण कटकोळे यांनी स्वागत केले. प्रा. विशाल गोडबोले यांनी आभार मानले.
कोविड विलगीकरण केंद्राचे उद्घाटन
इचलकरंजी : नगरसेविका ध्रुवती दळवाई व सदानंद दळवाई यांच्या एक वादळ संस्थेमार्फत सुतार मळा येथील शाळा क्रं. ६ मध्ये कोविड रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले. यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रुग्णांना नाष्टा, दोन वेळचे जेवण स्वत:च्या घरातून देण्याची सोय नगरसेविका दळवाई यांनी केली आहे. यावेळी अतुल बुगड, विश्वनाथ लोटे, प्रमोद फाटक आदी उपस्थित होते.