संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:09+5:302021-05-28T04:18:09+5:30
इचलकरंजी : सर्व प्रोसेसर्स व्यावसायिकांनी कोविडकाळात शासन नियम पाळून व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कोल्हापूर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक ...

संक्षिप्त
इचलकरंजी : सर्व प्रोसेसर्स व्यावसायिकांनी कोविडकाळात शासन नियम पाळून व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कोल्हापूर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले. सीईटीपी संस्थेच्या संचालक मंडळास संबोधित करताना ते बोलत होते. अध्यक्ष संदीप मोघे यांनी स्वागत केले. या वेळी संभाजी लोकरे, राजेश सावंत, मारुती पन्हाळकर आदी उपस्थित होते.
गरजूंना धान्यवाटप
कबनूर : येथील गरजूंना नवदुर्गा मंडपचे मालक महेश कांबळे यांनी धान्य व संसारोपयोगी साहित्य दिले. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार होत्या. सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शीतल कांबळे यांनी स्वागत केले. या वेळी सुलोचना कट्टी, सैफ मुजावर, प्रवीण जाधव, जावेद फकीर आदी उपस्थित होते.