खासगी पंटरच्या आडून लाचखोरीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:56+5:302020-12-30T04:30:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सरत्या वर्षात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गलेलठ्ठ पगार असतानाही पंटरच्या आडून लाचखोरीचा बाजार मांडला. ...

Bribery market under private punters | खासगी पंटरच्या आडून लाचखोरीचा बाजार

खासगी पंटरच्या आडून लाचखोरीचा बाजार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सरत्या वर्षात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गलेलठ्ठ पगार असतानाही पंटरच्या आडून लाचखोरीचा बाजार मांडला. वर्षभरात २७ लाचेच्या कारवायांमध्ये ३६ लाचखोर अधिकाऱ्यांपाठोपाठ सुमारे १३ पंटरना गजाआडची हवा खावी लागली. लाचखोर अधिकारी पडद्यामागे राहून पंटरला पुढे करुन आपले खिसे भरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय खात्यात पैसे घेतल्याशिवाय कामच पुढे सरकत नाही, असा जणू पायंडाच पडला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावा, सापळे रचा, अगर लाच घेणार नाही म्हणून हात उंचावून शपथ घ्या.... पण लाच घेणारे कमी झाले नाहीत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे रचून गेल्या वर्षभरात २७ ठिकाणी सापळे रचून लहान-मोठे मासे पकडले. विशेषत: महसूल व पोलीस विभाग या लाच प्रकरणात अव्वल दिसून आले. विशेषत: लाच स्वीकारताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगी पंटरच्या हातावर चिरीमिरी देऊन त्याला पुढे करुन आपण सहीसलामत राहण्याचा प्रत्न केला. पण अशा अधिकाऱ्यांच्या पंटरसह मुसक्या आवळण्यात लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. विक्रेता, चहावाला, तर काही ठिकाणी झिरो पोलीस अशा पंटरचा कारवाईत समावेश होता.

सर्वात मोठी कारवाई

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासात आतापर्यंत १० लाखाची डाॅक्टरकडून लाच स्वीकारताना आयकर अधिकाऱ्यास पकडलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

लाचेच्या सापळ्यात अडकलेले अधिकारी

उपअभियंता प्रमोद कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे, जलसंधारण कार्यकारी अभियंता यशवंत लक्ष्मण थोरात, जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके, आयकर अधिकारी प्रताप चव्हाण, महावितरणचे सहायक अभियंता अमर कणसे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ट्रॅप झाले पंटर

राजेंद्र कुंभार (शिरोळ), अभिमन्यू पाटील (बांदीवडे), अविनाश तांबेकर (इचलकरंजी), सुहास टक्केकर (टेंबलाईनाका), अमोल कोळी (शिरोळ), विशाल इंचनाळे (नंदगाव), प्रवीण लहू पाटील (कुरुकली), नीलेश सुतार (टेंबलाईवाडी), अनिकेत सरनाईक (मंगळवार पेठ), श्रीकांत घोडके (कोरेगाव), रोहित सोरप (उजळाईवाडी), संभाजी बसरवाडकर (इचलकरंजी), हारुण ईब्राहीम लाटकर (इचलकरंजी)

वर्षभरातील विभागवार कारवाई, एकूण संख्या, अटक संख्या

- महसूल : ०७ / १०

- पोलीस : ०५ / ०८

- ग्रामविकास विभाग : ०३/०३

- उद्योग व ऊर्जा : ०२/०२

- सार्व. आरोग : ०२/०३

- सार्व. बांधकाम : ०१/०१

- वित्त विभाग : ०१/०१

- मृद्‌ व जलसंधारण : ०१/०२

- मत्स्य विभाग : ०१/०१

- खासगी पंटर एकूण : १३

Web Title: Bribery market under private punters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.