शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसावेळीच हाणामारीत वाहनांची मोडतोड : मोरेवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:49 IST

Crime News Police Kolhapur- मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरात लावलेल्या गाण्याच्या कारणावरून चार युवकांनी गोंधळ माजवत परिसरातील काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड तसेच घरावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. ही घटना रविवारी रात्री मोरेवाडी येथे घडली. या हल्ल्यामध्ये संपत काकासाहेब जोगदंडे (रा. सनगर धनगर सोसायटी, मोरेवाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी चौघा संशयित युवकांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देवाढदिवसावेळीच हाणामारीत वाहनांची मोडतोड : मोरेवाडीतील प्रकार घरावर दगडफेक; तणावाचे वातावरण, एक जखमी, पाच युवकांवर गुन्हा

कोल्हापूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरात लावलेल्या गाण्याच्या कारणावरून चार युवकांनी गोंधळ माजवत परिसरातील काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड तसेच घरावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. ही घटना रविवारी रात्री मोरेवाडी येथे घडली. या हल्ल्यामध्ये संपत काकासाहेब जोगदंडे (रा. सनगर धनगर सोसायटी, मोरेवाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी चौघा संशयित युवकांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल प्रमोद शिंदे (रा. सनगर धनगर सोसायटी, मोरेवाडी) यांच्या लहान मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यांनी काही मित्रांना बोलावले होते. घरात जेवणाच्या कार्यक्रमावेळी गाणी लावण्याच्या कारणावरून वाद उफाळला. त्यावेळी चार युवकांनी रागाच्या भरात परिसरात उभ्या केलेल्या काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

तसेच रमाबाई सदाशिव जोगदंडे यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात दगड लागल्याने संपत जोगदंडे हे जखमी झाले. याप्रकरणी अनिल शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बापू ऊर्फ रियाज सलीम शेख याच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर