शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाॅकेटमनीतून काेराेना रुग्णांना नाश्ता, कोल्हापुरातील तरुणींचा आदर्श उपक्रम   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:44 IST

कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.

सचिन भोसले

कोल्हापूर : ‘त्या’ पाचहीजणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापैकी दोघीजणी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या. त्यावेळी त्यांनी रुग्णांसह कुटुंबीयांची होणारी पोटाची आबाळ पाहिली. इतर तीन मैत्रिणींशी चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला आणि सोमवारपासून सीपीआर परिसरात रोज सकाळी नाश्ता तयार करून देण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाॅकेट मनीतून होणारी ही मदत लाखमोलाची ठरत आहे.    

कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्या दुधाळी हरिमंदिर परिसरातील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी श्रुती व अर्पिता सीपीआरमध्ये कोरोना  लसीबाबत चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळचे कोरोना वॉर्डातील चित्र पाहून त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. दोघींनी श्रुतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रीण आचल कट्यारे आणि नेहा पाटील यांच्याशी चर्चा करून, सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. पालकांनी संसर्गाची भीती असल्याने जवळजवळ नकारच दर्शविला. मात्र पाचही जणींनी निर्णय बदलला नाही. आम्हाला पिझ्झा किंवा आईस्क्रिमसाठी पैसे देऊ नका. मात्र, या मदतीसाठी आर्थिक मदत करा, असे सांगितले. अखेरीस पालकांनी मदत करण्यास होकार दिला. सध्या त्या १०० लोकांना नाश्ता देत आहेत. 

सर्वत्र कौतुकश्रुती अहमदाबाद येथील युआयडीमधून डिझायनिंगमधील पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात आहे. अर्पिता ही विवेकानंद कॉलेजमध्ये बीबीए करीत आहे. श्रेया व तिची मैत्रीण आचल बारावीत आहेत, तर नेहा ही काॅम्प्युटर सायन्स करते.

कोरोनाच्या संकटात खारीचा वाटा म्हणून सीपीआरमधील रुग्ण आणि नातेवाईकांना सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरकरांनी दानशूर मंडळींना मदतीचा हात दिल्यास उपक्रम आणखी व्यापक करता येईल.- श्रुती चौगुले, कोल्हापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस