शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू कंटेनरचा ब्रेक फेल, वाकरे फाट्यानजीक तिहेरी अपघात; सुदैवाने जिवीतहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:32 IST

कोपार्डे - मालवाहू कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या ट्रँक्टर ट्रॉलीला जोराची धडक दिली. यात ट्रॉली पलटी होऊन रस्त्याच्या ...

कोपार्डे - मालवाहू कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या ट्रँक्टर ट्रॉलीला जोराची धडक दिली. यात ट्रॉली पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोटरसायकलवर कोसळल्याने मोटरसायकलचा चक्काचूर झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाकरे फाट्याच्या पुर्वेला उतारावर हा तिहेरी अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वारणा कोडोली येथील उदय निकम यांच्या मालकीचा मालवाहतूक करणारा कंटेनर (क्र. एम एच.०८-एच -२३५२) हा तळकोकणातून माल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर वाकरे फाट्याच्या पुर्वेला तीव्र उतारावर कंटेनरचा ब्रेक निकामी झाला.यावेळी चालक उपेंद्र कुमार याने भांबावून गेल्याने विरुद्ध दिशेने कोल्हापूरहून धुंदवडे कडे जाणाऱ्या ट्रँक्टर-ट्रॉलीला (क्र.एम.एच १२ डी-१२०७) ला धडक दिली. यात ट्रॉली उलटून रस्त्याच्या शेजारी लावण्यात आलेल्या साबळेवाडी (ता. करवीर) येथील वैभव केरबा गडकरी यांच्या मोटरसायकलवर उलटली. यात मोटर सायकलचा चक्काचूरा झाला. तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रँक्टर चालक सतीश कृष्णात कांबळे हा किरकोळ जखमी झाला आहे.अपघातानंतर कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरची वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात