अवैध धंदे, गुन्हेगारी मोडीत काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:41 IST2020-12-12T04:41:23+5:302020-12-12T04:41:23+5:30

कोल्हापूर : नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी, शहरातील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. ...

Break down illegal trades, crime | अवैध धंदे, गुन्हेगारी मोडीत काढा

अवैध धंदे, गुन्हेगारी मोडीत काढा

कोल्हापूर : नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी, शहरातील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. येथील कामकाजाची माहिती घेऊन अवैध धंदे, गुन्हेगारी मोडीत काढा, असे सक्त आदेश अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिले.

नूतन शहर पोलीस उपअधीक्षक चव्हाण यांनी गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतली. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. येथील दैनदिन कामकाजाची माहिती घेऊन दप्तराची तपासणी केली. गुन्हेशोध पथकाच्या कार्याचा आढावा घेतला. शिल्लक कामासह प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाबाबत आवश्‍यक त्या सूचनाही केल्या. पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचे समाधान करा, अशा सूचनाही केल्या. पोलीस ठाण्यातील सोयीसुविधा, लॉकअपचीही त्यांनी पाहणी केली. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि अपुरी कर्मचारी याबाबतही त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. ते अचानक पोलीस ठाण्यात आल्याने तारांबळ उडाली होती.

बातमीदार : विनोद

Web Title: Break down illegal trades, crime