ब्रेक द चेनमुळे शिरोळ ग्रामीण भागात जनजीवन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST2021-04-19T04:21:10+5:302021-04-19T04:21:10+5:30
तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. उदगाव कुंजवन येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात ...

ब्रेक द चेनमुळे शिरोळ ग्रामीण भागात जनजीवन ठप्प
तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. उदगाव कुंजवन येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात स्वॅब संकलनासाठी रांगा लागलेल्या असतात. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य दुकाने बंद आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. त्यामुळे पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, रविवारी वीकेंड लॉकडाऊनला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. तुरळक नागरिक वगळता रस्त्यावर संचारबंदीचे चित्र पाहावयास मिळाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, व्यावसायिकांनी मास्कचा वापर करावा, कोरोनाला आळा घालायचा असेल तर मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच लॉकडाऊनचा उपयोग होऊ शकतो.
फोटो - १८०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
शिरोळ येथे रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे शिवाजी चौकात शुकशुकाट होता. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)