शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंगला फोडून दहा लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:19 IST

कोल्हापूर : शासकीय विश्रामगृह परिसरातील बंद बंगला फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, घड्याळ, रोकड असा सुमारे दहा लाख ...

ठळक मुद्देसोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोत्यांचा समावेश

कोल्हापूर : शासकीय विश्रामगृह परिसरातील बंद बंगला फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, घड्याळ, रोकड असा सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. २६ ते २७ डिसेंबरदरम्यान ही चोरी झाली. प्रताप विष्णू पुराणिक (वय ७०, रा. प्रेरणा बंगला, तीर्थ गार्डन, सरक हाऊस) यांनी ३१ डिसेंबरला शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ज्येष्ठ नागरिक असलेले प्रताप पुराणिक हे २६ डिसेंबरला आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या प्रेरणा बंगल्याचे कुलूप व कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शयनगृहातील तिजोरी उचकटून त्यातील पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या चार नग, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोत्याच्या वाट्या असलेला सर, मोत्यांचा तीनपदरी सर, मोत्यांचा वेल, मोत्यांची सोन्यात बांधलेली अंगठी, चांदीच्या वाट्या, चांदीची नाणी, सोन्याचे पाणी दिलेले हातातील घड्याळ, अमेरिकन डायमंड असलेले टॉप्स, दुर्बीण, रोकड असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. २८ डिसेंबरला पुराणिक घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फोन करून चोरीची माहिती दिली. त्यानंतर ३१ डिसेंबरला त्यांनी रीतसर चोरीची तक्रार दाखल केली. सराईत चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचे समजते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड तपास करीत आहेत.------------------------ एकनाथ पाटील

 

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी