शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अंध मतदारांसाठी ‘ब्रेल’ची नक्कल मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:59 AM

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अंध मतदारांसाठी बे्रललिपीतील नक्कल (डमी बॅलेट पेपर) ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अंध मतदारांसाठी बे्रललिपीतील नक्कल (डमी बॅलेट पेपर) मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावरील नावांची शहानिशा करून संबंधित मतदाराला मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावासमोरील क्रमांकानुसार मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यात ४२३६ अंध मतदार असून सर्वाधिक ८२० कागल विधानसभा मतदारसंघात आहेत.अंध मतदारांसाठी यापूर्वीच्या निवडणुकीत मतदान यंत्रावर (ईव्हीएम) उमेदवारांच्या नावासमोर ब्रेललिपीतील क्रमांक होते. अशी रचना या निवडणुकीतही असणार आहे; परंतु यावेळी या मतदारांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती म्हणजे, मतदान यंत्रावर मतदान करण्यापूर्वी या मतदारांना उमेदवारांच्या नावाची ब्रेललिपीतील एक नक्कल मतपत्रिका संबंधित मतदान केंद्राध्यक्षांकडून दिली जाणार आहे. त्यावर त्या उमेदवाराचे नाव, चिन्ह व क्रमांकाची शहानिशा करता येऊ शकेल. त्यानंतर मतदाराला मतदान यंत्रासमोर जाऊन थेट मतदान करता येणे शक्य होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रथमच ही सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मतदारांना मतदान करताना कोणताही त्रास होणार नाही याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.या ‘ब्रेल’लिपीतील मतपत्रिका निवडणूक विभागाला दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रथमच अशा पद्धतीने अंध मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.मतदारसंघ मतदारांची संख्याचंदगड ४७४राधानगरी ७८५कागल ८२०कोल्हापूर दक्षिण १७३करवीर ४३२मतदारसंघ मतदारांची संख्याकोल्हापूर उत्तर ४५शाहूवाडी ४३२हातकणंगले ५१६इचलकरंजी १३६शिरोळ ४२३