तुर्केवाडीत ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांत-सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:48+5:302021-09-27T04:24:48+5:30
जी. ओ. गावडे, गोपाळ ओऊळकर, विश्वनाथ ढेकोळकर, सरपंच रुद्राप्पा तेली, शंकर ओऊळकर, मोहन निवगिरे यांच्या हस्ते मान्यवरांचे श्रीफळ व ...

तुर्केवाडीत ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांत-सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी सोहळा
जी. ओ. गावडे, गोपाळ ओऊळकर, विश्वनाथ ढेकोळकर, सरपंच रुद्राप्पा तेली, शंकर ओऊळकर, मोहन निवगिरे यांच्या हस्ते मान्यवरांचे श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जानबा चौगुले यांनी प्रास्ताविक केले. देगुलकर महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. एस. डी. पन्हाळाकर, समन्वयक सुशांत गुरव, चंदगडच्या रवळनाथ देवालयाचे शांताराम भिंगुर्डे यांनी आपण यशस्वी केलेल्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन नेमके कसे असावे, याबाबत मार्गदर्शन केले.
...........
बाबासाहेब कुपेकर यांना आदरांजली
ब्रह्मलिंग मंदिराचा समावेश क वर्गात करून १५ लाख निधी, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या खासदार फंडातून १० लाख व माजी सभापती ज्योती पाटील यांच्या फंडातून एक लाखाचा निधी मिळाल्याची आठवण, पण या बैठकीत करण्यात आली. त्यातच रविवारी माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांची आठवण म्हणून त्यांना बैठकीत आदरांजली वाहण्यात आली. सोहळा हा भरगच्च असून, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. योगीराज महाराज यांचे कीर्तन हे मुख्य बैठकीत सुरेश गावडे, बाबू हाजगुळकर, महादेव निवगिरे, संभाजी पाटील, भरमाण्णा अडकूरकर, रमेश पाटील, कष्णा चौगुले, महादेव गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
२६ तुर्केवाडी
तुर्केवाडी येथील बैठकीत जी. ओ. गावडे, सुशांत गुरव, डॉ. एस. डी. पन्हाळकर, शांताराम भिंगुर्डे, गोपाळ ओऊळकर, बी. डी. पाटील, शंकर ओऊळकर उपस्थित होते.