शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीमाबांधवांच्या प्रश्नी संसदेत आवाज उठविणार, खासदार अमोल कोल्हेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 14:59 IST

न्यायालयातील निकाल कधी लागायचा तो लागू दे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याबत पवार यांना विनंती करावी, असे सीमावासीयांनी कोल्हे यांना सांगितले.

कोल्हापूर : सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठवू, अशी ग्वाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. बंगळुरू येथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन परतताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर दोषींवर कारवाई करावी आणि शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने ४७ दिवस तुरुंगात डांबून ठेवले. त्यामुळे सीमाभागात प्रचंड संतापाची भावना होती. त्यामुळे बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक खासदार कोल्हे यांच्या हस्ते घालण्यात आला.विशेष म्हणजे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे परतत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा सत्कार करताना सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा व अडचणींचा पाढा वाचला. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडूसकर, अमित देसाई, पीयूष हवल, सागर पाटील, बळवंत शिंदोलकर, विकास कलगड, प्रकाश मरगाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी लक्ष घालण्यासाठी प्रयत्न कराकाही सीमावासीय मराठी बांधवांनी रात्री साडेबारा वाजता खासदार कोल्हे यांना थांबवून सत्कार केला. सीमाभागातील माणसाला ज्येष्ठ नेते शरद पवारच न्याय देऊ शकतात, न्यायालयातील निकाल कधी लागायचा तो लागू दे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याबत पवार यांना विनंती करावी, असे सीमावासीयांनी कोल्हे यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे