सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:15+5:302021-09-12T04:28:15+5:30

बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाजन अहवाल हाच अंतिम आहे, हे आपल्याला माहीत आहे. यापुढे या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा, ...

Boundary issue Mahajan report is final | सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम

सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम

बेळगाव :

बेळगाव सीमाप्रश्नी महाजन अहवाल हाच अंतिम आहे, हे आपल्याला माहीत आहे. यापुढे या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा, कोणत्याही प्रकारचे ठराव, विधाने आपल्याला माहिती नाहीत. त्यामुळे सीमाप्रश्न संदर्भात महाजन अहवाल अंतिम हेच ध्यानात घ्या, असे बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले, या संदर्भात तसेच इतर विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी म. ए. समितीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात उमटलेले पडसाद, सामनाचा अग्रलेख आणि बेळगावात भाजपने सीमाप्रश्नाचा ठराव करावा, या झालेल्या मागणीवर ते बोलत होते. शांतता भंग करणे हे त्या लोकांचे काम आहे. त्यांना किंमत द्यायची नाही. आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही. कर्नाटकाची एक इंच भूमी आम्ही देणार नाही आणि एक थेंब पाणी आम्ही देणार नाही, असे उद्गार गोविंद कारजोळ यांनी काढले.

Web Title: Boundary issue Mahajan report is final