प्रस्ताव पाठविण्यावर हद्दवाढ समिती ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST2021-01-25T04:26:03+5:302021-01-25T04:26:03+5:30
कोल्हापूर : महापालिकेने तात्काळ नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवावा, या मुद्यावर हद्दवाढ समर्थक कृती समिती ठाम आहे. ...

प्रस्ताव पाठविण्यावर हद्दवाढ समिती ठाम
कोल्हापूर : महापालिकेने तात्काळ नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवावा, या मुद्यावर हद्दवाढ समर्थक कृती समिती ठाम आहे. यासंदर्भात चार दिवसांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विचारणा केली जाणार असल्याची माहिती हद्दवाढ समर्थक कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार यांनी दिली.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर महापालिका प्रशासनाला हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव देण्याची सूचना केली होती. यानंतर हद्दवाढ कृती समितीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन ४२ गावांसह हद्दवाढीचा तात्काळ प्रस्ताव पाठवा, अशी मागणी केली. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली असून, क्षेत्रात बदल करता येत नसल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाचा असल्याने प्रस्ताव पाठविण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेऊ, असे डॉ. बलकवडे यांनी म्हटले होते. यावर कृती समितीने १० दिवसांत यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. याला १५ दिवस उलटून गेल्याने ते प्रशासकांना भेटणार आहेत.