‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

By Admin | Updated: February 20, 2015 23:16 IST2015-02-20T21:29:16+5:302015-02-20T23:16:27+5:30

पाटबंधारेचे ढिसाळ नियोजन : खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूरला फटका

The bottom reached by 'Chikotara' | ‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

म्हाकवे : चिकोत्रा नदीने तळ गाठल्याने खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चिकोत्रा नदी कोरडी पडू लागल्याने या नदी काठावरील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पसरले आहे. पाटबंधारे विभाग व महावितरणच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त होत आहे.चिकोत्रा नदीवरील खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, गलगल ही शेवटची गावे आहेत. चिकोत्रा धरणातून या नदीमध्ये पाणी सोडले जाते. ६ फेब्रुवारी दरम्यान धरणातून सोडलेले पाणी या नदीवर असणारे कोल्हापुरी संघासह लघुबंधारे भरत गलगले, बंधाऱ्यापर्यत आले आहे. हे धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकेवाडा-बेळुंकी या कोल्हापुरी बंधारा कोरडाच राहण्याची शक्यता आहे. कापशीपासून गलगलेपर्यंत सिंचन उपसा बंदी केली होती. तरीही या नदीतून सोडलेले पाणी खडकेवाडा बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे या गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, याची दखल घेऊन खडकेवाडा येथील कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत धरणातून सोडलेले पाणी बंद करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


सिंचन उपसा बंदी करून खडकेवाड्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमचे कर्मचारी रात्री-अपरात्री या नदीकाठावर गस्त घालत आहेत. दोन-तीन दिवस जादा पाणी सोडून खडकेवाडा बंधारा भरण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
- उत्तम कापसे, शाखाधिकारी पाटबंधारे विभाग, कागल


या नदीवरील सिंचन उपसा बंदीचा आदेश केला असला तरी पाटबंदारे विभाग आणि महािवतरणच्या अधिकाऱ्यांमुळे ताळमेळ नसल्याने आमच्या गावावर पाण्याचे संकट आले आहे. खडकेवाडा बंधारा करण्यापूर्वी धरणातून सोडलेले पाणी बंद केल्यास जनआंदोलन उभे करू.
- आप्पासाहेब पोवार,
उपरसरपंच, खडकेवाडा

Web Title: The bottom reached by 'Chikotara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.