मोटारसायकल घसरून दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST2021-02-13T04:24:39+5:302021-02-13T04:24:39+5:30

कोल्हापूर : तावडे हाॅटेल परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. परशुराम शंकर पन्हाळकर (वय ५५, रा. भुये) ...

Both were injured when the motorcycle slipped | मोटारसायकल घसरून दोघे जखमी

मोटारसायकल घसरून दोघे जखमी

कोल्हापूर : तावडे हाॅटेल परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. परशुराम शंकर पन्हाळकर (वय ५५, रा. भुये) व जयसिंग विश्वास पाटील (वय ५४, रा. वडणगे), अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

दुचाकी धडकेत दाम्पत्य जखमी

कोल्हापूर : येळवडे (ता. राधानगरी) येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत दाम्पत्य जखमी झाले. दिलीप गणपती मोरे (वय ३६) व दीपाली दिलीप मोरे (३०, रा. चंद्रे), अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघातात तिघे जण जखमी

कोल्हापूर : किणी टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. दादापीर गणीसाहेब धारवाड (वय ५०, हुबळी), अमित श्रीकांत धनवडे (२८, कुरळप), किरण पापालाल कांबळे (२०, रा. तळसंदे, ता. हातकणंगले), अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Both were injured when the motorcycle slipped