बेळंकी खूनप्रकरणी दोघे ताब्यात

By Admin | Updated: December 16, 2014 00:49 IST2014-12-16T00:45:33+5:302014-12-16T00:49:59+5:30

कसून चौकशी : पोलीस पथके कर्नाटकात रवाना; दोन दिवस पोलीस फौजफाटा तळ ठोकून

Both of them were arrested on the murder of Belunki | बेळंकी खूनप्रकरणी दोघे ताब्यात

बेळंकी खूनप्रकरणी दोघे ताब्यात

मिरज : बेळंकीत झालेल्या दोन महिलांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वैयक्तिक वाद किंवा मालमत्तेसाठी हे खून झाल्याचा संशय असल्याने दोघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे कर्नाटकातही पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, मात्र अद्याप कोणतीच ठोस माहिती हाती लागली नाही.
बेळंकीत शनिवारी रात्री यल्लम्मादेवी यात्रेतून परतणाऱ्या महिलांवर दोघांनी चाकूहल्ला करून लूटमार केली. चाकूहल्ल्यात सुनीता गायकवाड व मंगल घेवारे या दोघींचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्यासह पोलीस फौजफाटा दोन दिवस बेळंकीत तळ ठोकून आहे. कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कर्नाटकात गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
सुनीता गायकवाड यांच्यावर चोरट्यांनी चाकूने सपासप आठ वार केले आहेत, तर मंगल येवारे यांच्यावर चाकूचा एकच वार झाला आहे. यामुळे सुनीता गायकवाड यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला होता का? याची सखोल चौकशी सुरू आहे. वैयक्तिक वाद, अनैतिक संबंध किंवा मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने हा खून झाला आहे काय, याच्या चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्यांच्या चौकशीतून अद्याप ठोस पुरावे हाती लागले नसल्याची माहिती मिळाली. बेळंकी रेल्वे स्थानकाजवळून चोरट्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलचा शोध सुरू आहे. चोरी व लूटमारीच्या उद्देशाने खून करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही शोध सुरू आहे. बेळंकीत तंबू ठोकून पोलीस वेगवेगळ्या गुन्हेगारांची चौकशी करीत
आहेत. (प्रतिनिधी)

चोरी किंवा वैयक्तिक कारण : सावंत
पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, यातील मृत सुनीता गायकवाड यांचे लहानपणीच लग्न झाले होते. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. हल्ल्यात सर्वाधिक आठ वार त्यांच्यावर झाले आहेत, तर मंगल घेवारे यांच्यावर केवळ एकच वार झाला आहे.
चोरटे दागिने चोरण्यासाठी अगदी ठार होईपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वार करणार नाहीत. त्यामुळे हे दुहेरी हत्याकांड ऐवज लुटीसाठी झाले आहे, का यामागे वैयक्तिक काही कारण आहे, अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन तपासाला गती दिली आहे.

Web Title: Both of them were arrested on the murder of Belunki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.