कोल्हापूरचे दोन्ही संघ बाद फेरीत--
By Admin | Updated: March 11, 2015 00:48 IST2015-03-11T00:48:28+5:302015-03-11T00:48:40+5:30
राज्यस्तरीय कबड्डी

कोल्हापूरचे दोन्ही संघ बाद फेरीत--
सिंधुदुर्ग : पुणे, रत्नागिरी, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, नागपूर, सांगली यांनी महिला गटात, तर कोल्हापूर, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, ठाणे, सांगली, रत्नागिरी, मुंबई शहर यांनी पुरुष गटातून छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
जामसंडे (ता. देवगड) येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या ‘क’ गटात कोल्हापूरने सोलापूरला २४-१८ असे पराभूत केले खरे; परंतु त्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. कोल्हापूर यावेळी पराभूत झाला असता, तर गटातच बाद होण्याचा त्यांच्यावर प्रसंग ओढवला असता. कोल्हापूरकडून अरुणा सावंत, शुभदा माने यांनी चांगला खेळ केला.
पुरुषांच्या ‘अ’ गटात कोल्हापूरने नंदुरबारला २४-०७ असे चीत करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सागर खटाळे, ऋतुराज कोरवी यांनी उत्कृष्ट चढाया केल्या.