२७ नवीन रुग्णांसह दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:13 PM2020-11-14T16:13:45+5:302020-11-14T16:14:16+5:30

coronavirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या नवीन २७ रुग्णांची नोंद झाली तर दोघा वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला एक रुग्ण भुदरगड तालुक्यातील भडगांवचा तर दुसरा करवीर तालुक्यातील उचगांव येथील आहे.

Both died of corona, including 27 new patients | २७ नवीन रुग्णांसह दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

२७ नवीन रुग्णांसह दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

Next
ठळक मुद्दे२७ नवीन रुग्णांसह दोघांचा कोरोनामुळे मृत्यू कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४६ हजार ३८४

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या नवीन २७ रुग्णांची नोंद झाली तर दोघा वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला एक रुग्ण भुदरगड तालुक्यातील भडगांवचा तर दुसरा करवीर तालुक्यातील उचगांव येथील आहे.

शुक्रवारी कोल्हापूर शहरात ११ तर नगरपालिका हद्दीत चार रुग्ण तसेच गडहिंग्लज तालुक्यात दोन, चंदगड, करवीर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी एक रुग्णाची नव्याने भर पडली तर भुदरगड, आजरा, गगनबावडा, हातकणंगले, कागल तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ६६४ इतकी झाली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४६ हजार ३८४ इतकी झाली आहे. सध्या ६५४ रुग्ण जिल्ह्यात विविध रुग्णालयांतून उपचार घेत आहेत.

Web Title: Both died of corona, including 27 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.