शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:00 IST

प्राथमिक चौकशीत निष्पन्न

इचलकरंजी : शाळेला जातो, असे सांगून ८ नोव्हेंबरला घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय दोन्ही मुलींचा शोध लागला. त्या पुण्यातील एका नातेवाइकांकडे गेल्याचे समजल्यानंतर त्यांना पोलिस आणि नातेवाइकांनी परत आणले.त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी शाळेत कमी गुण मिळत असल्याने पुण्यात काम करून शाळा शिकू या, या उद्देशाने गेलो असल्याचे सांगितले. याबाबत महिला दक्षता समिती आणि महिला पोलिस अधिकारी यांच्यासमोर त्यांचा रीतसर जबाब होणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या दोघी मैत्रिणी ८ नोव्हेंबरला शाळेला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडल्या; परंतु त्या शाळेला गेल्या नाहीत आणि घरीही परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेऊन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद गावभाग पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, त्यातील एकीच्या पुण्यातील मामांच्या नातेवाइकांकडे त्या पोहोचल्यानंतर ही माहिती पालकांना समजली. त्यांनी पोलिसांना कळवून पुण्यातून दोघींना सुखरूप परत आणले.त्यावेळी त्यांना अधिक माहिती विचारली असता शाळेत सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाल्याने घरात रागावतात म्हणून आम्ही पुण्याला गेल्याचे सांगितले. तसेच इचलकरंजी ते पुणे स्वारगेट तेथून वाघोली आणि भोसरी असा प्रवास करून नातेवाइकांकडे पोहोचल्याचे सांगितले. परंतु संपूर्ण घटनाक्रम आणि तपास हा महिला दक्षता समितीसमोर होणार आहे.

सोशल मीडियावर ॲक्टिव्हया दोघी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होत्या. या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी असे धाडस केले असल्याची शक्यता आहे. त्यातील एका मुलीचे वडील हॉटेलमध्ये काम करतात, तर दुसऱ्या मुलीचे वडील यंत्रमाग कामगार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Missing girls found in Pune after low school grades.

Web Summary : Two Kolhapur girls, missing after leaving for school, were found in Pune. They ran away due to poor grades, hoping to work and study there. Police safely returned them.