शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी वृक्षांची लागवड करू नका, तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:16 IST

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देविदेशी वृक्षांची लागवड करू नका निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.जून महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेने शहर परिसरात राबविणार असलेल्या १५ हजार वृक्षारोपणासाठी अनेक देशी आणि विदेशी रोपांची निवड केली आहे. त्याची यादी यापूर्वी झाली आहे. यामध्ये कोनोकार्पस या घातक विदेशी वृक्षाचा समावेश आहे.

दोन प्रजातींमध्ये आढळणारा हा वृक्ष दक्षिण अमेरिका खंडातील आहे. काही देशांत याची लागवड करण्यात आली. तो हिरडा बेहडाच्या कुळातील आहे. याची फळे, फुले आकर्षक नाहीत, पण घनदाट पर्णसांभार व दाट सावली देणारा हा वृक्ष जलद वाढतो म्हणून लागवड केला जातो. परंतु, तो माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे.आपल्याकडे समृद्ध आणि नैसर्गिक वनस्पती विविधता असतानाही अनेक विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहोत. यामुळे आपली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. हे थांबविण्याचे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.पाणी पिणारा, इमारतींसाठी धोकादायक वृक्षकोनोकार्पस या वृक्षाची मोठ्या वेगाने वाढ होते. त्याची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व सर्व बाजूंनी वेगाने पसरतात. ही मुळे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. तसेच ती शेजारी असणाऱ्या इमारतींखाली शिरतात. यामुळे इमारती व इतर वृक्षांना धोकादायक ठरतात.माणसासाठी घातककोनोकार्पस वृक्ष माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याला वर्षातून दोन वेळा फुलांचा बहर येतो. तेव्हा मोठ्या प्रमाणात परागकण तयार होतात व वातावरणात पसरतात. ते माणसांच्या शरीरात श्वासामार्फत जातात. यामुळे घसा व श्वसनाचे आजार होतात. दमा आणि खोकल्याचा त्रास होतो.देशी वृक्षांचे रोपण कराबाहवा, तामण, कदंब, कडूलिंब, शिरीष, पांगारा, करंज, बकूळ यांसारख्या देशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड करा आणि कोल्हापूरच्या जैवविविधतेचे संरक्षण करा, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराने केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर