बोरवडेत नेत्यांच्या वारसदारांची ‘काँटे की टक्कर’

By Admin | Updated: February 17, 2017 01:01 IST2017-02-17T01:01:43+5:302017-02-17T01:01:43+5:30

राजकारणाची दिशा ठरविणारी लढत : भूषण पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात मोठी चुरस

Borwadeet's successors 'thorn in collision' | बोरवडेत नेत्यांच्या वारसदारांची ‘काँटे की टक्कर’

बोरवडेत नेत्यांच्या वारसदारांची ‘काँटे की टक्कर’

रमेश वारके-- बोरवडे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली असून, राजकारणाची दिशा ठरविणारी लढत म्हणून या मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जात आहे.
शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून बिद्रीचे माजी उपाध्यक्ष गणपराव फराकटे यांचा मुलगा मनोज, भाजपकडून प्रताप पाटील, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील गटाकडून अपक्ष म्हणून बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून यापूर्वी प्रतिनिधित्व केलेले कागलचे उपसभापती भूषण पाटील, यांच्यासह शेतकरी कामगार आघाडी तर्फे किशोर चौगले निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात ‘कॉँटे की टक्कर’ अशी लढत होत आहे. राजकीय नेत्यांच्या वारसदारांची ही निवडणूक नेत्यांची प्रतिष्ठा बनली असून, वारसदारांच्या या लढाईत कोण बाजी मारणार?याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. टोकाचे राजकारण व कार्यकर्त्यांची ईर्षा यामुळे इथले राजकारण नेहमीच संघर्षमय असते. प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, राजे समरजित घाटगे, बाबासाहेब पाटील या सर्व गटांची ताकद हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य होय.स्व. सदाशिवराव मंडलिकांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय प्रवासात या मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचा गट आहे. या गटाच्या माध्यमातून त्यांनी वीरेंद्र यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या मताधिक्यासाठी या गटाने कंबर कसली आहे. माजी आमदार संजयबाबा घाटगे व शिवसैनिकांची वीरेंद्रला साथ मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता सोडून इतर कोणतीही सत्ता नसताना गेली अनेक वर्षे संजयबाबा घाटगे यांचा गट या मतदारसंघात प्रबळ आहे. या निवडणुकीत सध्या प्रा. संजय मंडलिक व संजयबाबा घाटगे यांची शिवसेनेच्या माध्यमातून युती आहे. बोरवडे हा आमदार हसन मुश्रीफ यांचा बोलकिल्ला समजला जातो. अनेक वर्षे आमदारकी व मंत्रिपदाच्या काळात मुश्रीफ यांनी येथे आपली अभेद्य अशी कार्यकर्त्यांची गावागावांत राजकीय ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान आहे. राजे विक्रमसिंह घाटगे गटही या मतदारसंघात प्रभावी आहे. बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांची राजकीय ताकदही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचाही प्रभाव मतदारसंघात आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची घेतलेली भूमिका निर्णायक मानली जात आहे. तर प्रत्येक निवडणूक लढविणारे पी. टी. चौगले हे आपल्या मुलग्यासाठी जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
बोरवडे मतदारसंघात शिवसेनेला प्रा. संजय मंडलिक व संजय घाटगे यांच्यासह शिवसैनिकांनीची ताकद मिळत आहे. तर मुश्रीफ, राजे व बाबासाहेब पाटील गट स्वतंत्र लढत आहेत. विद्यमान उपसभापती भूषण पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने बंडखोरी करून पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीने बोरवडे मतदारसंघात चुरस आहे.


बंडखोरीचा फायदा कुणाला
बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने तिकिट नाकारलेल्या व अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उपसभापती भूषण पाटील यांच्या उमेदवारीने फायदा कुणाला व फटका कुणाला बसणार यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.


गटांची ताकद पणाला
बोरवडे मतदारसंघात सर्वच गटांची ताकद आहे.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे हे दोन गट एकत्रित, तर आमदार हसन मुश्रीफ, शाहूचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील हे गट स्वतंत्रपणे गटाच्या अस्तित्वाच्या ताकदीसाठी लढत आहेत.
निकालानंतर कोणाची ताकद किती हे समजणार आहे.

Web Title: Borwadeet's successors 'thorn in collision'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.