शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

हक्कासाठी लाच का? : आदिनाथ बुधवंत --संडे स्पेशल मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:05 IST

लाच देणे, घेणे गुन्हा आहे, तक्रार करून देशाचे सुजाण नागरिक व्हा..!

एकनाथ पाटील।

नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर पूर्वनियोजित सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. त्यानंतर तक्रारदाराचे जे शासकीय काम आहे त्यामध्ये अडवणूक होऊ नये याची दक्षता घेतली जाते. 

कोल्हापूर : महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, अन्न व औषध प्रशासन, कारागृह, महावितरण, आदींसह शासकीय कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे; त्यामुळे कोल्हापुरात लाचखोरांची संख्या जास्त असल्याचे कागदोपत्री स्पष्ट होते. नुकताच कोल्हापूर ‘एसीबी’चा पदभार उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी स्वीकारला. त्यांनी ‘एसीबी’च्या मुंबई-वरळी येथील मुख्यालयात एक वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक असा त्यांचा प्रवास गेल्या २५ वर्षांचा आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद ....

प्रश्न : जिल्ह्यात लाचखोरांचा टक्का वाढतोय काय?उत्तर : कमी श्रमात जास्त पैसे मिळविणे, तत्काळ जामीन मिळत असल्याने कायद्याचा धाक नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष, दहांपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येतो अन्य नऊजण पैसे (लाच) देऊन कामे करून घेतात. या सर्व कारणांमुळे शेकडो कारवाई होत असल्या तरी शासकीय कार्यालयात लाच स्वीकारण्याचा फंडा काही कमी झालेला नाही.

प्रश्न : लाचेच्या तक्रारी येण्यासाठी काय केले जाते.उत्तर : लाच देऊ नये, लाच देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा पद्धतीने नागरिकांत प्रबोधन केले जात आहे. पोस्टरबाजी, पत्रकबाजी, प्रसारमाध्यमांतूनही जनजागृती केली जाते. तसेच वर्षभरातील तक्रारदारांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रश्न :  नागरिकांना काय संदेश द्याल?उत्तर : लोकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाºया नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत; त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्री १०६४ व मोबाईल नंबर ७०८३६६८३३३, ९०११२२८३३३, कार्यालय-(०२३१-२५४०९८९), व्हॉटस अ‍ॅप-७८७५३३३३३३ संपर्क साधण्याबाबत पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागkolhapurकोल्हापूर