सीमाभागातील रस्ते दोन महिन्यांनंतर खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:40+5:302021-06-19T04:17:40+5:30
वेदगंगा नदीवरील चिखली-कुरली बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर चिखली-कौलगे रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला असून, खडकेवाडा येथील ...

सीमाभागातील रस्ते दोन महिन्यांनंतर खुले
वेदगंगा नदीवरील चिखली-कुरली बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर चिखली-कौलगे रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला असून, खडकेवाडा येथील ओढ्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तोही रस्ता बंदच आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले यांनी पुढाकार घेत निपाणी पंचायत समितीच्या सदस्या अनिता देसाई (बुदिहाळ )तसेच पंचायत समितीचे माजी अध्यक्ष विनायक पाटील यांच्याशी संपर्क साधून चिखलीकरांच्या अडचणीबाबत माहिती दिली.
त्यांनी तत्काळ निपाणीचे तहसीलदार प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असणारा रस्ता आज खुला झाला.
आप्पाचीवाडी येथील रस्ता खुला करण्यात आला.
छाया दत्तात्रय पाटील, म्हाकवे