सीमाभागातील रस्ते पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:48+5:302021-04-22T04:23:48+5:30
म्हाकवे : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कर्नाटक प्रशासनाने सीमाभागातील अनेक रस्ते बंद केले आहेत. म्हाकवे-आप्पाचीवाडी, कुर्ली या ...

सीमाभागातील रस्ते पुन्हा बंद
म्हाकवे : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कर्नाटक प्रशासनाने सीमाभागातील अनेक रस्ते बंद केले आहेत. म्हाकवे-आप्पाचीवाडी, कुर्ली या रस्त्यावर खंदक काढून हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाकवे,आणूर, बानगे परिसरातील नागरिकांना कागल अथवा कोल्हापूरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. खंदक काढल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीचीही अडचण झाली आहे. त्यामुळे कुर्लीकडे जाणारा मार्ग बंद केला तरी चालेल, पण आप्पाचीवाडीचाही रस्ता बंद झाल्याने अत्यावश्यक सेवाही पर्यायी मार्गाने वळवावी लागणार आहे.
दरम्यान, या मार्गावर कर्नाटकातील आप्पाचीवाडी हे एकच गाव येते. या गावाच्या बाहेरून बायपास मार्गाची सोय आहे. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने पूर्णतः रस्ता बंद न करता योग्य तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी-म्हाकवेकर यांनी केली आहे.
कँप्शन
म्हाकवे-आप्पाचीवाडी रस्ता असा खंदक (चर) काढून बंद केला आहे
छाया-दत्तात्रय पाटील