रेनिसान्स स्टेट या पुस्तकावर देशात बंदी घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:43+5:302021-05-28T04:18:43+5:30

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : ज्येष्ठ पत्रकार, संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनिसान्स स्टेट या ...

The book Renaissance State should be banned in the country | रेनिसान्स स्टेट या पुस्तकावर देशात बंदी घालावी

रेनिसान्स स्टेट या पुस्तकावर देशात बंदी घालावी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : ज्येष्ठ पत्रकार, संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनिसान्स स्टेट या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल टीका केली आहे. त्यामुळे समाजामध्ये खोटा इतिहास प्रसारीत करणाऱ्या रेनिसान्स स्टेट या पुस्तकावर देशभरात बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रांताधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

निवेदनात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासात व्रतस्थ राहून जीवन चरित्राचा अभ्यास करतात. तसेच संपूर्ण महिनाभर अनेक गोष्टी वर्ज्य करतात आणि सर्वच हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनहेतूला मनाशी धरून त्यांच्याच मार्गावरून चालतात. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्या लिखाणामुळे महाराष्ट्रातील देव, देश धर्मभक्त कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात जाती-जातीत तेढ निर्माण व्हावे, यासाठी अशा पद्धतीचे लिखाण केले गेले आहे. त्यामुळे कुबेर यांच्या पुस्तकावर देशात बंदी घालावी; अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल, असे म्हटले आहे.

Web Title: The book Renaissance State should be banned in the country