शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात तपोवन मैदानात बॅगेत आढळली हाडे, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:59 IST

मानवी हाडे असल्याचा संशय, तपासात फॉरेन्सिक लॅबची मदत

कोल्हापूर : तपोवन मैदानात झाडीत टाकलेली हाडांची बॅग कुत्र्यांनी ओढून आणल्याचे लक्षात येताच तिथे खेळणाऱ्या तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपासणीसाठी हाडे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली. मानवी हाडे असल्याचा प्राथमिक संशय असून, ही बॅग कोणी आणून टाकली, याचा शोध घेण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे. हा प्रकार रविवारी (दि. २१) दुपारी घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी तपोवन मैदानावर खेळणाऱ्या मुलांना काही कुत्र्यांनी ओढून आणलेली बॅग दिसली. त्या बॅगेत हाताची, पायाची आणि अन्य अवयवांची हाडे होती. मानवी हाडे असल्याचा संशय बळावताच तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, सहायक पोलिस निरीक्षक सागर यांच्यासह पोलिस तपोवन मैदानात दाखल झाले. सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलवले. संबंधित हाडे मानवी सांगाड्यातील असावित, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, ती कधी टाकली असावीत? महिलेची आहेत की पुरुषाची आहेत? त्याचे वयोमान? याचा शोध घेण्यासाठी हाडे फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून, बॅग टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस हवालदार नामदेव पाटील, ज्ञानेश्वर राऊत, सागर डोंगरे, अमर पाटील, योगेश गोसावी घटनास्थळी उपस्थित होते.बॅग नेमकी कोणी टाकली?बॅगेतील हाडांवर काही नंबर लिहिलेले दिसत आहेत. त्यावरून एखाद्या प्रयोगशाळेतील हाडांचा सांगाडा खराब झाल्यानंतर त्यातील हाडे बॅगेत भरून टाकली आहेत काय? किंवा जादूटोण्यासाठी त्याचा वापर झाला आहे काय? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

घटनेने खळबळबॅग भरून हाडे सापडल्यामुळे तपोवन परिसरात खळबळ उडाली. संबंधित हाडे नेमकी कशाची आहेत, याचा उलगडा होत नसल्याने परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या मनात या घटनेमुळे भीती निर्माण झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी