महापालिका प्रभाग रचना, आरक्षणाचा ‘बॉम्ब’ आज फुटणार

By Admin | Updated: July 31, 2015 00:41 IST2015-07-31T00:41:17+5:302015-07-31T00:41:17+5:30

रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये जाहीर सोडतीद्वारे प्रभाग आरक्षणे निश्चित केली जाणार

The 'bomb' of the municipal ward structure, reservation | महापालिका प्रभाग रचना, आरक्षणाचा ‘बॉम्ब’ आज फुटणार

महापालिका प्रभाग रचना, आरक्षणाचा ‘बॉम्ब’ आज फुटणार

कोल्हापूर : आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यावरील आरक्षणाची सोडत आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये जाहीर सोडतीद्वारे प्रभाग आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत.
दरम्यान, सकाळी नऊ वाजता ८१ प्रभागांची नावे व नकाशाच्या प्रती महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित होणार आहेत. प्रभाग रचना नेमकी कशी असणार, यासंबंधी इच्छुकांत मोठी उत्सुकता आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना सादर करण्याकरिता ३ ते १० आॅगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हरकती व सूचनांचे विवरणपत्र १३ आॅगस्टला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.
आज प्रभागांचे क्षेत्र, त्यांचे नकाशे यासंबंधीची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. तसेच बहुउद्देशीय हॉलवरही ते पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने यावेळी ८१ प्रभाग तयार केले असून, त्यामधील ४१ प्रभाग महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. शहरात चार लाख ७० हजार इतके मतदार असून, ते ८१ प्रभागांत विभागले गेले आहेत.
प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याकरिता २१ जानेवारी २०१५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत ही यादी अद्ययावत केली जाणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. (प्रतिनिधी)



 

Web Title: The 'bomb' of the municipal ward structure, reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.