आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टर शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:05+5:302021-02-05T07:00:05+5:30
हातकणंगले तालुक्यातील बोगस डाॅक्टरांच्या बाबतीत काही तक्रारी होत्या. या तक्रारींबरोबरच शासनाच्या नियमानुसार दवाखाने चालू आहेत का याची पडताळणी ...

आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टर शोधमोहीम
हातकणंगले तालुक्यातील बोगस डाॅक्टरांच्या बाबतीत काही तक्रारी होत्या. या तक्रारींबरोबरच शासनाच्या नियमानुसार दवाखाने चालू आहेत का याची पडताळणी करण्यासाठी तालुका आरोग्याधिकारी सुहास कोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत दवाखान्यातील यंत्रसामग्री, डॉक्टरांचे कागदपत्रे, तेथील औषधे व इंजेक्शन यांची पाहणी करण्यात आली. हुपरी व पट्टणकोडोली गावांतील तपासणीत काही त्रुटी आढळलेल्या डाॅक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. यानुसार येत्या सात दिवसांत सुधारणा झाली नसल्यास संबंधित डाॅक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कोरे यांनी सांगितले. या कारवाईसाठी आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी व पोलीस यंत्रणा यांची संयुक्तिक समिती स्थापन करणार असल्याचेही सांगितले.
तर आजच्या मोहिमेची चाहूल लागल्याने काही डाॅक्टरांनी दवाखाने बंद केल्याचे तपास पथकाच्या लक्षात आले.