बोरवडे येथे विहिरीत सापडला ऊसतोड मजुराचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST2020-12-07T04:18:55+5:302020-12-07T04:18:55+5:30

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सरवडे (ता. राधानगरी) येथील अजित मारुती मोरे यांच्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर मयत ऊसतोडणी मजूर ...

The body of a sugarcane laborer was found in a well at Borwade | बोरवडे येथे विहिरीत सापडला ऊसतोड मजुराचा मृतदेह

बोरवडे येथे विहिरीत सापडला ऊसतोड मजुराचा मृतदेह

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सरवडे (ता. राधानगरी) येथील अजित मारुती मोरे यांच्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर मयत ऊसतोडणी मजूर काम करत होता.गुरुवार दि. ३ रोजी बापू भोसले हा कोणालाही न सांगता गायब झाला होता. तेव्हापासून अजित मोरे व इतर ऊसतोडणी मजूर त्यांचा शोध घेत होते.

बोरवडे येथील सूर्याजी दत्तात्रय बलुगडे यांच्या मालकीच्या विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. त्यांनी ही माहिती पोलीस पाटील गौतम कांबळे यांना दिली. त्यांनी मुरगूड पोलिसांना याबाबत कल्पना दिली. या घटनेची वर्दी अजित मोरे यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून, पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल गोंजारे करीत आहेत.

Web Title: The body of a sugarcane laborer was found in a well at Borwade